कळवणला प्रकल्पअधिका-यांना आदिवासी शिक्षक कर्मचारी संघटनेचे निवेदन कसमादेपेसुदि( नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- काल मंगळवार दिनांक ६/1१०/२०२० रोजी सीटू संलग्न आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना माध्यमातून कोरोना महामारीत कराव्या लागणाऱ्या सर्व्हे कामासाठी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि कर्मचारी बांधवांना 50 लाखाचे विमा कवच, याबाबत प्रकल्प अधिकारी सो कळवण यांना निवेदन देण्यात आले. प्रकल्प अधिकारी महोदय मिटिंगसाठी नाशिक येथे गेले कारणाने मा. वडजे सो सहा. प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी भावना व्यक्त केल्या. आपल्या भावना कार्यालयाने ऐकल्या आणि सदर मागणी रास्त असून स्वतः मा. प्रकल्प अधिकारी महोदय यांना संघटनेचे निवेदन देऊन झालेल्या चर्चेबाबत यथाशक्ती अवगत करून देणेबाबत मा. वडजे साहेबांनी सांगितले.
सदर कामाला आमचे कर्मचारी विरोध करत नाहीत पण ही वेळ पूर्ण पणे अयोग्य असल्याचे त्यांनी मान्य केले….
आज या प्रसंगी निवेदन देताना श्री.बी.के. गांगुर्डे, श्री. काकुळते सर, श्री. एन.जी.देवरे, श्री. एस.पी.देवरे, श्री. एस.पी. थोरात, श्री. ए.बी. सूर्यवंशी, श्री. जे.के. सोनवणे, श्री. वाय.ई. बागुल, श्री बालाजी सूर्यवंशी, श्री. जयकिशोर राऊत, श्री. अतुल आहेर, श्री. एस.बी. बिरादार उपस्थित होते.
महाराष्ट्र भर सीटू संघटनेच्या वतीने हा प्रशासनाला जागे करण्याचा एकहाती कार्यक्रम घेऊन यशस्वी केला याची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल.असेही यावेळी नमुद करण्यात आले.