*कौळाणेत ग्रामसेवकांची चालली मनमानी , पत्रकारांची झाली मानहानी म्हणून न्याय मिळे पर्यंत करणार आमरण उपोषण ….* *मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* गावात कुठल्याही शासनाच्या विकासात्मक योजनांची परिपुर्ण अंमलबजावणी करण्याची नैतिक जबाबदारी असते,ती ग्रामसेवकांची!त्याशिवाय गावात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनानां विरोध करुन त्याचा वेळोवेळी अहवाल वरिष्ठांना सादर करण्याची व गावपातळीवर शासकीय मालमताचे संरक्षण करण्याबरोबरच गावावर नियंत्रण ठेवण्याची नैतिक जबाबदारी शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकाची असते.मात्र गावाचा सेवक असलेला ग्रामसेवकच जेव्हा ….गावात राजकारण खेळून अतिक्रमण करणाऱ्याना प्रोत्साहन देऊन पाठीशी घालत असेल,आणि गैरकारभार करुन गावाचे पुरते वाटोळे करत असेल तर कसा साधला जाणार गाव खेडयांचा विकास?महात्मा गांधी नेहमी म्हणत की,खेडयांकडे चला!पण…खेडयाकडे चालण्यासारखी परिस्थिती आताच्या गढूळ व गचाळ राजकारणाने पुरती बिघडवून टाकली आहे.गावागावात राजकारण खेळायला आता काही ग्रामसेवकांनीही सुरुवात केलेली आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या कौळाणे (निं)गांवी तर तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे याने पदावर नसलेल्या तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांच्या संगनमताने आपल्याला नसलेल्या अधिकाराचा गैरवापर करुन विभागीय महसूल आयुक्तांचा अधिकार स्वतःच वापरुन संपूर्ण महाराष्ट्रात एक नवाच इतिहास घडविला आहे,त्याशिवाय व-हाणे गावीदेखील ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला व शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्याचे धाडस केले.यांच्यात नेमकी हि हिंमत व मस्ती येते कुठून?हा संशोधनाचा विषय ठरत असला तरी,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनाच फसविण्याचे धाडस करणाऱ्या या ग्रामसेवकावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज युवा मराठा न्युज चँनल परिवाराच्या वतीने मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी धनजंय निकम यांना निवेदन देऊन मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी येत्या १२आँक्टोबरपासून मालेगांव पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.तर याबाबतीत मालेगांव कँम्प पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी राजेंद्र पाटील राऊत यांचेशी चर्चा करताना सांगितले की,लवकरच गटविकास अधिकाऱ्यांशी याप्रश्नी बैठक घेऊन सदरचा प्रश्न सोडविला जाईल,तर आमरण उपोषणाचे निवेदन गटविकास अधिकारी,उपविभागीय अधिकारी( प्रांत),अप्पर पोलिस अधीक्षक यांना देताना सात दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम युवा मराठा न्युजकडून देण्यात आला आहे. (क्रमशः -आजचा कौळाणेतील भुमिगत गटारीचा लेख उद्या नक्की वाचा)
Home Breaking News कौळाणेत ग्रामसेवकांची चालली मनमानी , पत्रकारांची झाली मानहानी म्हणून न्याय मिळे पर्यंत...