• Home
  • मेशी परिसरात मुसळधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान

मेशी परिसरात मुसळधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान

मेशी परिसरात मुसळधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरात शनिवार दि.१९ रोजी रात्री झालेल्या मूसळधार पावसाने परिसरातील कांदा, डालिम्ब, कांदयाचे रोप ,मका ह्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती पिकांबरोबरच घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे एक तर आधीच उन्हाळ कांदयाचे बियान्याची टंचाई त्यामुळे प्रतिकिलो तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये देऊन शेतकरी वर्ग कांदा बियाणे खरेदी करत असून त्यातच दररोज होणाऱ्या पावसामुळे कांदयाच्या रोपाबरोबरच नवीन लागवड केलेला कांदा देखील खराब होत येथील शंकर निम्बा अहिरराव यांच्या कांदा पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे तर भगवान दत्तू शिरसाठ यांच्या घराचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी खूपच आर्थिक संकटात सापडला असल्याने शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेती पिकांची व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेशी ग्रामपंचायतीचे सदस्य शाहू शिरसाठ यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment