Home Breaking News देगलूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

देगलूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

90
0

देगलूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देगलूर,(संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज )-देगलूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पावसामुळे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी, नाले ,तलाव, तुडुंब भरून वाहत आहेत काल अति पावसामुळे देगलूर ते उदगीर रस्ता करडखेड जवळील पुलावरून पाणी जात असल्यामुळे जवळपास दोन तास रस्ता बंद होता. तसेच देगलूर ते नांदेड हा रस्ता वझरगा गावाजवळील नदीवरून पाणी जात असल्यामुळे तो पण रस्ता जवळपास दोन तास बंद होता. तालुक्यातील नदीकाठील शेतांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, त्या पिकांचे लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.अशी आम जनतेची मागणी जनतेतून होत आहे.कारण गेल्या पावसामुळे मूग व उडीद या पिकांना मोड फुटून पूर्णपणे वाया गेले होते. त्यात परत या पावसामुळे राहिलेल्या पिकांचे कापूस, सोया, तुर,असे सर्व पिकांचे परत नुकसान झाले असून या तालुक्यातील सर्व शेतकरी आर्थिक  संकटात सापडला असून हा तालुका पूर्णपणे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. अशी या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे.

Previous article*छावा जनक्रांती संघटनेचा मंत्रालयात दणका धडक*
Next articleजनतेने टँक्सस्वरूपात भरलेल्या पैशातून कंगनाला वाय पल्स सुरक्षा कशासाठी ? अभिनेत्री उर्मिला मातोंडकर*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here