• Home
  • कंगना राणावत विरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सेवानिवृत पोलिसांचे निवेदन

कंगना राणावत विरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सेवानिवृत पोलिसांचे निवेदन

*कंगना राणावत विरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सेवानिवृत पोलिसांचे निवेदन* नाशिक दि १०,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- मुंबई पोलिसांचे कार्यक्षमतेवर आ क्षेपार्य विधान करुन बदनामी करणारी कंगना राणावत तिच्याविरुद्ध निषेध व्यक्त करून काय देशीर कारवाई करणे बाबत निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी नाशिक जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांचा भाग आहे रात्रंदिवस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाची बाजी लावून पोलीस अहोरात्र मेहनत घेत असतात अनेक वेळा अतिशय आव्हानात्मक गुन्ह्यांचे तपास करून जगातील दोन नंबरचे पोलीस दल असा लौकिक मुंबई पोलिसांनी मिळवलेला आहे पाकिस्तानने मुंबईत अतिरेकी पाठवून अचानक हल्ला केला त्या अतिरेक्यांची सामना करताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी शहीद झालेले हवालदार तुकाराम ओंबळे यांनी कसाब या अतिरेकीस अंगावर अंगावर गोळ्या घेऊन जीवाची परवा न करता पकडले त्यात शहीद झाले परंतु त्यांनी कसाबला पकडले म्हणून पाकिस्तान जास्त कट उघडकीस आला व जगासमोर पोलिसांच्या शौर्याचे गुणगान झाले मुंबई पोलीस दलातील कैलासवासी हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम ओंबळे हे सर्व देशासाठी लढत असताना शहीद झालेले आहे आजही भारतातील मुंबई इतक्या मोठ्या शहरात कायदा व सुव्यवस्था इतकी चांगली आहे तशी आपले देशातील इतर कोणत्याही ही शहरात नाही महिला भगिनी मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुरक्षित आहेत हे मुंबई पोलिसाचे योगदान आहे तसेच covid-19 च्या काळात मुंबई पोलीस दल अहोरात्र मेहनत घेऊन स्वतः धोका पत्करून अनेकांचे जीव वाचविले आहेत अशा कर्तबगार मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका करण्याचा कंगना राणावत ची अवकात काय आहे तिने कर्तबगार व कर्तव्यदक्ष व कर्शा मुंबई शहर पोलिसांवर टीका करून पोलीस खात्याचा दलाचा अवमान केला आहे म्हणून या वक्तव्याचा निषेध करून तिच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन पाठवलेले आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पोटे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर सचिव सुरेश भामरे सहसचिव मुजफ्फर सय्यद अनिल मकासरे नाशिक जिल्हा बॉईज संघटनेचे अध्यक्ष श्री मोसिन सय्यद निवेदन देतेवेळी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment