• Home
  • 🛑 कंगनाचं पुन्हा ट्वीट; राणी लक्ष्मीबाईंच्या पावलांनी मुंबई दाखल होण्याचे दिले संकेत… 🛑

🛑 कंगनाचं पुन्हा ट्वीट; राणी लक्ष्मीबाईंच्या पावलांनी मुंबई दाखल होण्याचे दिले संकेत… 🛑

🛑 कंगनाचं पुन्हा ट्वीट; राणी लक्ष्मीबाईंच्या पावलांनी मुंबई दाखल होण्याचे दिले संकेत… 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 सप्टेंबर : ⭕ अभिनेत्री कंगना रानौत मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच ती मुंबईत पोहोचणार आहे. या संदर्भातल एक सूचक ट्वीटही तिने केले आहे. त्यामुळे आता मुंबईत येऊन ती शिवसेनेशी कसा सामना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा वाद सुरु असताना कंगनाने मुंबई पोलीस व मुंबईत संदर्भात विविध विधान केले होती. या विधानावरून तिच्यावर फार टीकाही झाली. तसेच मुंबईत येऊन दाखवण्याची धमकी दिली. या धमकीच्या प्रतीउत्तरात आज 9 सप्टेंबरला मुंबईत येणारच अस ठणकावून सांगितले होते.

मी चित्रपटाद्वारे राणी लक्ष्मीबाईंचे धैर्य, पराक्रम आणि त्याग जगली आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे मला स्वतःच्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जात आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या पावलावर चालत राहीन,मी घाबरणार नाही, झुकणार नाही…,जय महाराष्ट्र, जय शिवाजी..

दरम्यान अभिनेत्री कंगना रानौतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.त्यामुळे हिमाचलमधून चंदिडगडीसाठी ती रवाना झाली होती. आज ती मुंबईत दाखल होणार आहे. या विरोधात शिवसैनिक आक्रमक होणार आहे. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना सामना रंगतो का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.⭕

anews Banner

Leave A Comment