राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर
लॉकडाऊन काळात राज्यातील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन
कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) दि.८, लॉकडाऊन काळात राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ या नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली आहे.
राज्यातील शिक्षकांमधून सात गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
1) अंगणवाडी गट
2) प्राथमिक गट (पहिली ते चौथी)
3) माध्यमिक गट (पाचवी ते दहावी)
4) उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावी)
5) मुख्याध्यापक (गट)
6) शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी (गट)
7) शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ति (गट)
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. संदीप ज्ञानदेव मुळे आणि
नाशिक येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब गणपत बडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धा यशस्वितेसाठी राज्यातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त शिक्षक प्रयत्नशील होते.
प्रत्येक गटातील प्रथम दहा उपक्रमशील शिक्षकांना आणि प्रत्येक गटात चार उत्तेजनार्थ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्मरणचिन्ह आणि प्रमाणपत्र कुरिअरने तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मेलवर/व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात आले आहे, असे साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’चे मुख्य संपादक मधुकर घायदार यांनी सांगितले.
(खाली मुखपृष्ठ, स्मरणचिन्ह, प्रमाणपत्र तीन फोटो खाली पाठवित आहे)
राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षकांची नावे
1) अंगणवाडी गट
सौ. संगिता सतीश भालेराव, पुणे; अनुराधा किरण जाधव, नाशिक; सौ. शालिनी संजय पगारे, औरंगाबाद; पल्लवी छगन दुसाने, नाशिक 2) प्राथमिक गट सौ. मोहिनी पंडित बागुल, ठाणे; डॉ. सौ. मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे, बुलढाणा; श्री. सुरेश ज्ञानोबा सातपुते, पुणे; श्री. तारीश आब्बास अत्तार, सांगली; श्री शाहू भिकाजी पाटील, कोल्हापूर; श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे, अमरावती; सौ. करुणा विजय गुरव, सोलापूर; श्रीमती मनीषा भानुदास शिंदे, जळगाव; श्रीम. शिल्पा बाळासाहेब फरांदे, सातारा; सुरेश नत्थु लांजेवार, भंडारा; श्री. धन्यकुमार प्रल्हाद तारळकर, सातारा; श्रीम. गितांजली नामदेव खाडे, सोलापूर; श्रीमती सुप्रिया भारत ताकभाते, सोलापूर;
सौ. संध्या रुपेश सावंत, मुंबई; 3) माध्यमिक गट श्रीमती प्रतिभा लोखंडे नागपूर व श्रीमती प्रतिभा बाबासाहेब टेमकर औरंगाबाद (संयुक्तरीत्या); श्रीम. निता भास्कर आरसुळे, जालना; सौ. विजया अविनाश दांगट, पुणे; श्रीमती सारीका धन्यकुमार जैन, औरंगाबाद; श्री. काशीनाथ वसंतराव अहिरे, नाशिक; श्री. मनोहर श्रीराम भैसारे, भंडारा; श्री. ध्रुवास ममराज राठोड, जळगांव; डॉ. मीरा राजेंद्र शेंडगे सोलापूर; श्री. चंद्रकांत दगडू चव्हाण, सातारा; श्री. शिवराज आप्पाराव ढाले, सोलापूर; श्री. विश्वास राघो पाटोळे, नाशिक; श्री. सोमनाथ भानुदास चौधर, पुणे; श्री. जनार्दन प्रभाकर वाघमारे, सोलापूर; सौ. विभा विजय साबळे, सातारा; 4) उच्च माध्यमिक गट
श्री. मच्छिंद्र रघुनाथ कुंभार, कोल्हापूर; श्रीमती मेघा अनिल पाटील, नंदुरबार; प्रा. डॉ. मच्छिंद्रनाथ दिनकरराव नागरे, सोलापूर; श्री. संजय दाजीबा घरत पालघर; श्री. प्रभाकर नागनाथ भालके, रत्नागिरी; श्री. सुनिल बबनराव अडसुळे, पुणे; श्री. शशिकांत सुर्यकांत उदेग, रत्नागिरी; 5) मुख्याध्यापक गट डॉ. सी. सुरेश नायर, मुंबई; श्री. मनोहर धनगर चौधरी, धुळे; श्री. लक्ष्मण महादेव घागस, ठाणे; सौ. सुमैया सल्लाउद्दीन तांबोळी, सोलापूर; सौ. पाकिजा उस्मान पटेल, जळगाव; श्री. अनिल कानिराम चव्हाण, बुलढाणा; श्री. पद्माकर रावसाहेब मोरे, उस्मानाबाद; श्री. प्रकाश निवृत्ती पांढरे, रत्नागिरी; सौ. इरफाना नासिरहुसेन संदे, सांगली; श्री. सुभाष निवृत्ती जाधव, पुणे; सौ. सुनिता विलास चव्हाण, पुणे; श्री. अविनाश विष्णूपंत ताकवले, पुणे; 6) शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी (गट) श्रीमती दीपाली दिलीप बाभुळकर, अमरावती; श्री. परेश भगवान पडोळकर, बुलडाणा; श्री. भारत चिंतामणी बंडगर, सांगली; 7) शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ति श्रीमती प्रीती प्रविणकुमार दबाडे, पुणे; मंजुषा संजीव खत्री, नाशिक; शिक्षणयज्ञ समूह चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर; श्रीमती अर्चना संभाजी भरकाडे, यवतमाळ; अशोक नागोराव बिजले, नांदेड