*१२सप्टेंबर पासुन विशेष ८० नव्या रेल्वे गाड्या सुरू होणार*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
मार्च महिन्यापासून देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सार्वजनिक सेवा बंद होत्या. या सेवा आता हळूहळू पुन्हा चालू होतांना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे रेल्वे वाहतूक. मे महिन्यापासून काही रेल्वेगाड्या हळूहळू चालू करण्यात आल्या. तेव्हापासून सध्या २३० गाड्या देशभरात सुरू आहेत. त्यानंतर आता आणखी ८० विशेष रेल्वे १२ सप्टेंबरपासून चालू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुढील दिवसांमध्ये येऊ घातलेल्या दिवाळी, नवरात्री या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार १० सप्टेंबरपासून या गाड्यांच्या रिझर्वेशनला सुरुवात होणार आहे.
तसेच यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल व आवश्यकतेनुसार जेथे वेटिंग लिस्ट जास्त असेल तेथे ठराविक रेल्वेच्या आधी एक क्लोन रेल्वे चालवली जाईल असेही ते म्हणाले. याशिवाय परीक्षा किंवा इतर महत्वाच्या कारणांसाठी एखाद्या राज्यात रेल्वेची आवश्यकता भासली तर राज्य सरकारच्या मागणीनुसार तेथे रेल्वेगाड्या पुरवल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.