Home Breaking News *क्रीडा विकास हाच ध्यास घेतलेला गुणी दिलदार खेळाडू*

*क्रीडा विकास हाच ध्यास घेतलेला गुणी दिलदार खेळाडू*

284
0

*क्रीडा विकास हाच ध्यास घेतलेला गुणी दिलदार खेळाडू* भारतिय क्रीडा विकास व पदोन्नति महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेला निलेश मधुकर राणे या खेळाडूचे फेसबुक पेज मी वाचले आणी त्याचेशी चर्चा करावी असे वाटले आणी मी फोन करुन बोललो अगदी आस्थेने निलेश बोलला मी सुरु करीत असलेल्या क्रिकेट अकेदमी बद्दल मी चर्चा केली त्याने एका क्षणात मदत करण्याचे आश्वासन दिले नंतर प्रत्यक्ष भेट झाली चर्चेतून त्याचा क्रीडा शेत्रातील अतिशय संघर्षमय प्रवास समोर आला, भसावळ हे निलेश चे जन्मगाव.प्राथमिक शिक्षण घेत असताना त्याला क्रिकेट व फुटबॉल खेळाची विशेष आवड होती, खेळत असताना त्याचे कौशल्य क्रीडा शिक्षकांच्या लक्षात आले त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरू लागला. वयाच्या 11 व्या वर्षी त्याला यश आले आणी त्याची क्रिकेट मध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली पन क्रिकेट हा महागडा खेळ त्यासाठी लागणारी साधने, शहरात जाऊन राहनेसाठी लागणारा पैसा, या गोष्टी आड आल्या, घरची आर्थीक स्थिती नाजूक असल्यामूळे तो स्पर्धेत खेळू शकला नाही, घ्यावी लागलेली ही माघार त्याला सतावत होती, आपण आपले ध्येय सोडायचे नाही ही मनाशी गाठ बांधून निर्धार करुन निलेश नासिक येथे आपल्या बहिणीकडे रहावयास आला, तेथे छोट्या मोठ्या कंपनीत काम करुन त्याने क्रीडा शिक्षक पदवी घेतली.आणी स्वतच्या मनातील अपूर्ण राहिलेली इच्छा दुर्लक्षित खेळाडूंना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढून पुढे नेण्याचे कार्य सुरु केले. खेळाडू कौशल्य असताना देखील आर्थीक परिस्थिती मुळे मागे राहतात हे दुख त्याला स्वस्थ बसू देत नव्हते.आणी हे स्वप्न पुर्ण करणेसाठी व्ही एम डबलू स्पोर्ट्स व सायवा महाराष्ट्र हया क्रीडा संस्थाची स्थापना केली या मार्फत तो राज्यातील ग्रामीण भागातील व गरजू खेळाडूना अचुक मार्गदर्शन व मदत करुन कौशल्य असलेल्या खेळाडूना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य धडाडीने करीत आहे व आपले स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.देशात विविध राज्यामध्ये निलेशच्या या संस्थेचे खेळाडू यश मिळवित आहेत. मार्गदर्शक म्हणून त्याने आताप्रर्यन्त 4000 हून अधिक दर्जेदार खेळाडू घडविले आहेत. निलेशच्या क्रीडा शेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्याला राष्ट्रीय युवा प्रेरणास्तोत्र या पुरस्काराने गौरविले आहे,भारतातील 25 जनामध्ये भारत गौरव म्हणून ही त्याची निवड झाली आहे, इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्येही त्याचे नाव नोंदवले गेले आहे. नेपाळ मध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नासिक व आपल्या ग्रामीण भागासाठी ही अभिमानाची बाब आहे व क्रीडा विकासासाठी ही बाब महत्वपूर्ण ठरत आहे. निलेश च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडु पुढे जाण्यासाठी वाव मिळनार आहे.आतापर्यंत घडवलेले 4000 खेळाडू आज आज चांगल्या स्तरावर खेळत आहेत व त्या बळावर शासकीय निमशासकीय नोकरी करीत आहेत.निलेश च्या कार्याची पावती म्हणून त्याला आतापर्यंत १ अंतर राष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ५ राज्यस्तरीय पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले आहे तसेच ३ राष्ट्रीय रेकॉर्ड बुक मध्येही त्याचे नाव नोंदवण्यात आले आहे, तुझा हा खडतर प्रवास आजच्या तरुण खेळाडूसाठी नक्कीच आदर्श असेल .निलेश तुझ्या कार्याला सलाम खरच तू खुप मोठे काम करतो आहे कारण मी स्वत क्रिडा शेत्र जाणुन आहे, तुझ्या सारखे अनेक खेळाडू आर्थिक परिस्थिती मुळे पुढे जाण्यापासुन रोकले गेले आहेत अशी अनेक उदाहरणे मी ग्रामीण भागात आणी शहरात बघितली आहेत आणी मी ही त्यातून गेलो आहे, शालेय स्तरावर जिल्हा पातळीवर,राज्यस्तरावर, आजुनही पाहिजे तशी स्वच्छ निवड प्रणाली नाही ही माझी खात्री आहे. आंतर विभागीय, आंतर विध्यापीट क्रिकेट स्पर्धा मध्ये ही कित्येक चांगले खेळाडू ओळखी आभावी निवड होण्यापासुन दुरावले आहेत हे माझे अनुभव आहेत, या माझ्या एकट्याच्या भावना नाहित तर अनेक दुर्लक्षित खेळाडूंच्या भावना व दुख आहे त्या आज मी व्यक्त केल्या, तू यात नक्की लक्ष घालशील आणी निवड प्रणाली अधिक पारदर्शक कशी होईल यासाठी प्रयत्न करशील. हे करने देशाच्या क्रिडा शेत्रासाठी खुप गरजेचे आहे आणी असे झाले तरच आपण जागतिक स्तरावर क्रिडा शेत्रात पुढे जाऊ हीच खेळाडू आणी देशवासीयांची इच्छा आहे, तुझ्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे असेच कार्य करीत रहा विष्णू अहिरे, विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक, 

Previous article🛑 विद्यापीठ परीक्षा कशा होणार? वाचा सर्व ११ शिफारशी 🛑
Next articleऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ होईपर्यंत कोईता हातात धरणार नाही ; “या’ संघटनेने दिला इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here