Home Breaking News अमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध

अमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध

77
0

पुणे ३ सप्टेंबर 🐄🐄⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🐄🐄

अमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध

महाराष्ट्रात पुण्यातील मंचर येथील भाग्यलक्ष्मी या डेअरी फार्मचे दूध अंबानी कुटुंबापासून ते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरसारखे मोठे सेलिब्रिटी पितात. हा फार्म २७ एकरमध्ये पसरला आहे. या फार्ममध्ये ३५०० गाई आहेत, ७५ कर्मचारी आहेत आणि १२००० ग्राहक त्यांच्याकडून दूध घेतात.

त्यांच्या दुधाची किंमत ८० रुपये प्रति लिटर आहे. फार्मचे मालक देवेंद्र शाह स्वतःला देशातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक मानतात. त्यांचा पहिला कपड्याचा व्यापार होता नंतर ते दुधाच्या व्यापारात आले.

pride of cow प्रॉडक्ट १७५ ग्राहकांपासून सुरू झाले होते. आज त्यांचे मुंबई आणि पुण्यात १२००० पेक्षा ग्राहक आहेत. त्यामध्ये बरेच मोठमोठे सेलिब्रिटीपण आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या गाई फक्त आरओ चे पाणी पितात.🧂🧂🧂

जसे वातावरण असेल तसे त्यांच्या गाईंचे डाएट डॉक्टर त्यांना सांगतात. जेव्हा गाईचे दूध काढले जाते तेव्हा जेवढा वेळ गाई रोटरीमध्ये असते तोपर्यंत जर्मन मशीनने तिची मसाज केली जाते. गाईंसाठी टाकण्यात आलेले रबर मॅट दिवसातून तीन वेळा स्वच्छ होतात.🥛🥛🍼🍼

या फार्ममध्ये ५४ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई आहेत. जुन्या ग्राहकाच्या रेफरन्सशिवाय नवीन ग्राहक ते घेत नाहीत. दरवर्षी ७ ते ८ हजार पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. दूध काढण्यापासून ते पॅकिंगपर्यंत माणसाचा हात दुधाला लागत नाही.🐄🐄⭕

फार्ममध्ये येताना सर्वात आधी ते पायांवर डिसइंन्फेक्शन पावडर टाकतात. दूध काढायच्या आधी प्रत्येक गाईचे तापमान आणि वजन चेक केले जाते. आजारी असलेली गाय लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते.
🍼🍼🍼
गाईचे दूध सरळ पाईपमधून साईलोजमध्ये जाते आणि मग शुद्धीकरण होऊन बाटलीत भरले जाते. एका वेळेला ५० गाईंचे दूध ७ मिनिटात काढले जाते🐄🐄🐄⭕⭕🍼🍼🍼🍼

Previous article🛑 सुप्रीम कोर्टात आज काय झालं….? मराठा आरक्षणा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घुसखोरी – सदावर्तेचा युक्तिवाद 🛑
Next article
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here