*खासगी रुग्णालयातील मुजोर प्रशासनाला युनायटेड नर्सेस असोसिएशन चा दणका.*
*नाशिक,*(राजेंद्र वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*नाशिक येथील प्रख्यात असलेले गुरुजी रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिका प्रतिक्षा मुंढे या गेल्या २ वर्षांपासून कार्यरत आहेत.* त्या *०८ सप्टेंबर २०१८ ते ०१ मार्च २०१९* पावेतो याच रुग्णालयाचे *औरंगाबाद येथे असलेल्या शाखेमध्ये कार्यरत होत्या* तसेच सदर परिचारिका ह्या *०१ मार्च २०१९ ते ३० जुलै २०२०* या कालावधीत श्री गुरुजी रुग्णालय नाशिक येथे *आय सी यु स्टाफ नर्स* म्हणून कार्यरत असून सदर परिचारिका ह्या *महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे रजिस्टर्ड नर्स आहेत.* या परिचारिकेला सरकारी सेवेत कंत्राटी स्वरूपात नोकरी लागली असल्यामुळे *सरकारी आदेशानुसार ०७ दिवसांच्या आत नोकरीवर रुजू व्हावे लागत असल्याने त्यांना तेथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता* तरी देखील सदर परीचारिकेने नियमाप्रमाणे *गुरुजी रुग्णालय प्रशासनाकडे त्यांच्या नोकरीचा राजीनामा लिहून घेऊन गेले असता रुग्णालय प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकार न करता त्यांना वारंवार धमकावले की तुम्ही नोकरी सोडू शकत नाही, तुमचा पगार देणार नाही, तुमची डिपॉझिट केलेली रक्कम मिळणार नाही , एक्सट्रा काम (Over Time) केल्याचा मोबदला मिळणार नाही , तुमचे रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करू, तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशा धमक्या ह्या सदर परीचारिकेला गुरुजी रुग्णालय प्रशासनाने दिल्या. ह्या परीचारिकेने वारंवार विनंती करून देखील रुग्णालय प्रशासनाने या परिचारिकेचे काहीही ऐकून घेतले नाही. व वरून रुग्णालयात किंवा रुग्णालयाच्या आवारात येण्यास बंधन केले. व परिचारिकेचे आजोबा प्रशासनाला भेटावयास गेले असता प्रशासनाने नकार देत त्यांना माघारी पाठवले. सदर परिचारिका ही अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांना रुग्णालय प्रशासनाने धमक्या दिल्या कारणाने तिचे घरचे वातावरण अतिशय तणावाखाली गेले तिला काय करावं काही सूचेना असे असताना त्या परीचारिकेने गुरुजी रुग्णालय प्रशासनाची तक्रार *युनायटेड नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (United Nurses Association Maharashtra) या संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. अजय भास्कर मराठे यांच्याकडे केली* असता श्री. अजय मराठे यांनी गुरुजी रुग्णालय प्रशासन व्यवस्थापकांना संपर्क साधून या परिचारिकेच्या अडचणी सोडवण्यासाठी विनंती केली परंतु व्यवस्थापकांनी अरेरावीची उत्तरे देऊन विषय टाळला. अखेर *श्री. अजय मराठे यांनी युनायटेड नर्सेस असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र राज्य यांच्या संपूर्ण टीम ला घेऊन गुरुजी रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन* रीतसर *१९४७ च्या कायद्यानुसार लेखी स्वरुपात पत्र दिले व येत्या ८ दिवसात सदर परिचारिकेचे हक्क तिला रुग्णालय प्रशासनाने पूर्ण न केल्यास आपल्या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारून कायदेशीर कारवाई करू असे पत्र दिले* असता सदर *परीचारिकेला रुग्णालय प्रशासनाने ८ दिवसांच्या आत बोलावून त्यांना त्यांचा पूर्ण महिन्याचा पगार, इतरत्र जास्तीचे काम केल्याचा मोबदला, जप्त केलेली डिपॉझिट व २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र देऊ केलें.*
तरी पुढे *श्री. अजय मराठे म्हणतात, की कोरोना या महामारीच्या काळात नर्सेस आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा बजावताय त्या अनुषंगाने राज्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच नर्सेस वर अन्याय होतोय, नियमांची पायमल्ली होतेय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायला हवी. त्यासाठी राज्यातील सर्व नर्सेस ने समोर येणे गरजेचे आहे असे आवाहन युनायटेड नर्सेस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. अजय भास्कर मराठे यांनी केले आहे.* यासाठी *युनायटेड नर्सेस असोसिएशनचे मुंबई रिजन चे अध्यक्ष श्री. मिलिंद मोटे, अविनाश ब्राम्हणे* तसेच *युनायटेड नर्सेस असोसिएशन नाशिक जिल्ह्याची टीम गोकुळ शेळके,दीपक गिरासे, निखिल केदार, विशाल जगताप, अविनाश पवार, स्वप्नील बोरसे,हेमंत पवार,सुमित सावंत,समाधान ठोंबरे,अश्विनी कदम,स्नेहल तायडे या सर्वांचे महत्वाचे योगदान लाभले.*