• Home
  • कळवण – मुलीच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून उपजिल्हा रुग्णालयात पीपीई किट  मास्क, सॅनिटायझर 

कळवण – मुलीच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून उपजिल्हा रुग्णालयात पीपीई किट  मास्क, सॅनिटायझर 

कळवण – मुलीच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून उपजिल्हा रुग्णालयात पीपीई किट  मास्क, सॅनिटायझर
(आनंद नागमोती वरिष्ठ उपसंपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-

कळवण दि २६ सानवी भूषण शिरोरे च्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने कळवण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना खासदार भारतीताई पवार यांचे हस्ते पीपीई  किटचे मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. भूषण शिरोरे यांचा आदर्श घेत नागरिकांनी यावर्षी कोरोनाचे गांभीर्य ओळखून वाढदिवस लग्नसमारंभ सध्या पद्धतीने साजरे करून समाजउपयोगी कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन खासदार भारतीताई पवार यांनी केले.

कळवण येथील आर एस टायर्सचे संचालक तथा  भाजपा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष भूषण शिरोरे यांची मुलगी सानवी हिचा आज दुसरा वाढदिवस होता. सध्या संपूर्ण देशात कोरोना महामारीचा हाहाकार असल्याने शिरोरे परिवाराने सानवीचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. व हा वाचलेला अनावश्यक खर्च काहीतरी सत्कारणी लागावा म्हणून त्यांनी कोविड योद्धे म्हणजे कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ३१ पीपीई किट वाटण्याचा निर्णय घेतला. आज खासदार भारतीताई पवार यांचे हस्ते पीपीई किट,  मास्क, सॅनिटायझर  वाटप करण्यात आले. यावेळी जि  पचे माजी अर्थ व बांधकाम सभापती रविंद्र देवरे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ निलेश लाड, दो प्रशांत खैरे यांनी स्वीकारले. या एका पीपीई किटची किंमत एक हजार रुपये असून वाटप करण्यासाठी घेत असल्याने त्यांना सवलतीच्या दारात उपलब्ध झाले आहेत.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरणार, तालुका महामंत्री डॉ अनिल महाजन, माजी अध्यक्ष सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा  पगार, सरचिटणीस विश्वास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमूख, माणिक देवरे, दिपक वेढणे,  संदिप अमृतकार, प्रविण रौंदळ, रुपेश शिरोडे, अमित देवरे, हेमंत रावले, चेतन निकम, सचिन सोनवणे, नामदेव निकम, रामकृष्ण पगार, काशिनाथ गुंजाळ, कृष्णकांत कामळस्कर, मोतीराम वाघ, यतीन पवार, विलास शिरोरे, सतीश कोठावदे, प्रशांत सोनजे, पुष्कर वेढणे,  पवन कोठावदे भगवान सोनजे, सागर वाणी, आनंद नागमोती,  तेजस कोठावदे, चेतन शिरोरे प्रणव शिरोरे गौरव शिरोरे, स्वप्निल शिरोरे, आशुतोष आहेर आदींसह उपजिल्हा रुग्णलयात कर्मचारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment