• Home
  • 🛑 आता भाडे तत्त्वावर घेता येणार…..! तुमच्या पसंतीची कोणताही गाडी 🛑

🛑 आता भाडे तत्त्वावर घेता येणार…..! तुमच्या पसंतीची कोणताही गाडी 🛑

🛑 आता भाडे तत्त्वावर घेता येणार…..! तुमच्या पसंतीची कोणताही गाडी 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या वेगाने लोकप्रिय ठरत असलेल्या भाडे आणि स्बस्क्रिप्शन सेवेत आता टोयोटा मोटरने देखील एंट्री केली आहे. आता टोयोटा देखील आपली वाहने भाडे आणि स्बस्क्रिप्शनवर देणार आहे.

टोयोटाने ही सेवा सध्या काही ठराविक शहरात सुरु केली असून, लवकरच देशभरातील आणखी काही महत्त्वाच्या शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल.

या सेवेंतर्गत ग्राहक 3 ते 5 वर्ष या कालावधीसाठी भाड्याने आपल्या आवडीची टोयोटाची कार घेऊ शकतात. यासाठी त्यांना दर महिन्याला एक निश्चित भाडे द्यावे लागेल. या भाड्याच्या शुल्कामध्येच ग्राहकांना कार मेटेंनेस, विमा आणि रोड साइट असिस्टेंस सेवा मिळेल. तर स्बस्क्रिप्शन सेवेंतर्गत ग्राहकांना टोयोटाच्या कारचा 24 ते 48 महिन्यांपर्यंत उपयोग करू शकतात.

भारतात या सेवेंतर्गत टोयोटाच्या ग्लँजा, यारिस, इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्यूनर आणि लाँच होणारी अर्बन क्रूजर या कार उपलब्ध होतील. टोयोटाला विश्वास आहे की ग्राहकांना त्यांची नवी मोबिलिटी सेवा नक्की आवडेल.

सध्या ओटोमोबाईल क्षेत्रामध्ये या प्रकारची सेवा झपाट्याने लोकप्रिय होत आहे. काही दिवसांपुर्वी टाटा मोटर्सने देखील अशाच प्रकारची सेवा लाँच केली आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment