• Home
  • 🛑 मनसेच्या निशाण्यावर पुन्हा शिवसेना….! महापौरांवर केले गंभीर आरोप 🛑

🛑 मनसेच्या निशाण्यावर पुन्हा शिवसेना….! महापौरांवर केले गंभीर आरोप 🛑

🛑 मनसेच्या निशाण्यावर पुन्हा शिवसेना….! महापौरांवर केले गंभीर आरोप 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून अनेक उपाय करण्यात आले. परंतु, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरच मनसेनं गंभीर आरोप केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केला आहे.

मुंबईत पालिकेनं कोविड सेंटर उभारली आहे. पण, सेंटरच्या कामाचं एक कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

कोणतीही पडताळणी न करता हे काम देण्यात आलं आहे’, असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

‘कोविडच्या परिस्थितीत आपल्या मुलाला काम दिल्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

त्याचबरोबर, ‘कोरोनाच्या परिस्थितीत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम बंद आहे. शासकीय काम सुद्धा व्हिडिओ कान्फरन्सद्वारे होत आहे. खुद्द पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेत आहे, मग मुंबई पालिकेचे सभागृह बंद का आहे?’ असा सवालही देशपांडे यांनी उपस्थितीत केला आहे.

याआधीही संदीप देशपांडे यांनी मुंबई पालिका आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाला प्लास्टिकची कीट दिली जाते, या कीटच्या किंमतीही गैरव्यवहार झाल्याचा दावा देशपांडे यांनी केला होता….⭕

anews Banner

Leave A Comment