• Home
  • 🛑 ब्रेकिंग न्यूज….! सोलापूर शहरातील पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी…! हे नियम लागू 🛑

🛑 ब्रेकिंग न्यूज….! सोलापूर शहरातील पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी…! हे नियम लागू 🛑

🛑 ब्रेकिंग न्यूज….! सोलापूर शहरातील पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी…! हे नियम लागू 🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर :⭕ कोरोना संसर्ग कमी करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या कडक संचारबंदीनंतर आता टप्प्याटप्याने विविध लघू व मोठे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे.

सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत पान टपऱ्या सुरु राहतील. मात्र, त्यांना टपरीबाहेर धुम्रपान करु नये, असे फलक लावणे बंधनकारक असणार आहे.

⭕आदेशातील ठळक बाबी ⭕

सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहणार पान टपऱ्या
दुकानदार-ग्राहकांना मास्क बंधनकारक; थुंकण्यासही मनाई
पान टपरीधारकांना दुकानाबाहेर धुम्रपानाबद्दल फलक लावणे बंधनकारक
दरवाजे, हॅण्डल स्वच्छ व सॅनिटाईज करणे सक्‍तीचे
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपऱ्या सुरु करण्यास परवानगी मिळाली.

मात्र, त्यांच्याकडे सक्षम प्राधिकरणाकडील परवाने असणे सक्‍तीचे आहे. ठरवून दिलेल्या वेळेतच पान टपऱ्या सुरु आणि बंद होतील, असेही आयुक्‍त शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, पान टपरीसमोर गर्दी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. टपरीसमोर तथा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून तसे फलक पान टपरीधारकांनी लावावेत, असेही आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे. ग्राहक आणि पान टपरी चालकाने मास्क घातलेले असावे, अशा सक्‍त सूचना महापालिका आयुक्‍तांनी दिल्या आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे….⭕

anews Banner

Leave A Comment