पुणे १० ऑगस्ट💰💵💵 (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)💰💵💵पुणे आळस नडला आणि आणि आठ लाख रुपये गमावले . एका ठेकेदाराला गाडीतील पैसे घरी नेण्याचा आळस नडला त्या ठेकेदाराने गाडीत ठेवलेली 8 लाख रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली गाडीची काच फोडून रक्कम पळवली विशेष म्हणजे त्या ठेकेदाराने कामगारांच्या पगारी साठी मित्रांकडून घेतले होते.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी परितोष रामचंद्र पायगुडे वय (३७ रा. अंकुर पार्क महर्षी नगर) हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी कामगाराचा पगार देण्यासाठी मित्र व परीचितानकडु 8 लाखाची रोकड गोळा केली होती. ही रोकड त्यांनी त्यांच्या ईनोवा कार मध्ये एका पिशवीत हॅन्डब्रेकच्या जवळ कप्प्यात ठेवली होती फिर्यादीने गाडी ७ ऑगस्टला सोसायटीच्या बाहेर लावली होती दरम्यान ९ऑगस्टला
गाडीची डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली त्यांनी गाडीउघडुन आतील रक्कम पाहिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कोणीतरी आपली रक्कम चोरलेली आहे. तेव्हा त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगितला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस बी जायभाय हे करत आहेत
