Home Breaking News *विजदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात,*

*विजदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात,*

423
0

*युवराज संभाजीराजे छत्रपती*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली असता ना.पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला दुरूस्ती खर्च तयार करण्याचे दिले आदेश दिले आहेत. तर, दोन दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.
समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. किल्लय़ामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार बुधवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली.
पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावरूनच थेट दिल्ली गाठत गड-संवर्धनासाठी संभाजीराजेंनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत, मागणीचे निवेदन देऊन, परिस्थितीची माहिती दिली होती. यानंतर काल स्वतः संभाजीराजे हे विजयदुर्ग किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी करण्यास पोहोचले. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारस्याचे जतन करणे गरजेचे असून येणाऱ्या पिढ्यांसाठी गरजेचे असल्याच्य भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. काल पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल.
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे मंत्री बच्चू कडू यांनी केले खुल्या दिलाने स्वागत
प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळेच माहात्म्य आणि सौंदर्य असते, तसे विजयदुर्गाचे सुध्दा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. विजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधिकरणच्या अंतर्गत दिला तर जवळपास ८०% किल्ला ‘पुनर्बांधणी’ करून घेता येईल. “पुनर्बांधणी” हा शब्द मी जाणीवपूर्वक घेतला, कारण हा असा एकमेव समुद्री किल्ला आहे, ज्याच्या जुन्या पद्धतीच्या बांधकाम शैलीतील इमारती बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत.
सचिन सावंत मराठा म्हणून जन्माला आले एवढंच खरं बाकी.मराठा समन्वय समितीने सावंतांना झापले
त्यावर तज्ज्ञांची थोडी जरी मदत घेतली तरी आपण खूप मोठं कार्य करू शकतो. आम्हाला रायगड वरती काम करत असताना पुनर्बांधणी करण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत. कारण, इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत.
महाराष्ट्रातील सरकार असो की केंद्र सरकार असो, केवळ मुंबई-दिल्लीत वातानुकुलीत कार्यालयांत बसून, कधीतरी पत्र लिहून, भाषण करून किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. त्याकरिता किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन, बारकाईने अभ्यास करूनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेवू.*विजदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात,*
*युवराज संभाजीराजे छत्रपती*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली असता ना.पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला दुरूस्ती खर्च तयार करण्याचे दिले आदेश दिले आहेत. तर, दोन दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.
समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. किल्लय़ामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार बुधवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली.
पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावरूनच थेट दिल्ली गाठत गड-संवर्धनासाठी संभाजीराजेंनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत, मागणीचे निवेदन देऊन, परिस्थितीची माहिती दिली होती. यानंतर काल स्वतः संभाजीराजे हे विजयदुर्ग किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी करण्यास पोहोचले. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारस्याचे जतन करणे गरजेचे असून येणाऱ्या पिढ्यांसाठी गरजेचे असल्याच्य भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. काल पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल.
प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळेच माहात्म्य आणि सौंदर्य असते, तसे विजयदुर्गाचे सुध्दा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. विजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधिकरणच्या अंतर्गत दिला तर जवळपास ८०% किल्ला ‘पुनर्बांधणी’ करून घेता येईल. “पुनर्बांधणी” हा शब्द मी जाणीवपूर्वक घेतला, कारण हा असा एकमेव समुद्री किल्ला आहे, ज्याच्या जुन्या पद्धतीच्या बांधकाम शैलीतील इमारती बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत.
त्यावर तज्ज्ञांची थोडी जरी मदत घेतली तरी आपण खूप मोठं कार्य करू शकतो. आम्हाला रायगड वरती काम करत असताना पुनर्बांधणी करण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत. कारण, इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत.
महाराष्ट्रातील सरकार असो की केंद्र सरकार असो, केवळ मुंबई-दिल्लीत वातानुकुलीत कार्यालयांत बसून, कधीतरी पत्र लिहून, भाषण करून किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. त्याकरिता किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन, बारकाईने अभ्यास करूनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेवू.

Previous article*मुंबईत 1000 कोटी रुपयांची 191 किलो ड्रग्स पकडली, आतापर्यंत 2 जणांना अटक*
Next article*कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक* *घडामोडी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here