केबीएचके विद्यालय खालपची कन्या मेशी केंदात प्रथम
( युवा मराठा न्यूज प्रतिनिधि ज्ञानेश्वर वाघ खालप ) सर्व विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ आणि शिक्षक यांना कळविताना अत्यंत आनंद होतो की, आपल्या केबीएचके विद्यालय खालप ता देवळा येथील इ. १० वीची विद्यार्थीनी कुमारी जयश्री संजय सुर्यवंशी या विद्यार्थीनीला मार्च २०२० मधे झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत ९१.७६ टक्के गुण मिळाले असुन तिने विद्यालयात आणि मेशी केंद्रात देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे .
आजपर्यंतच्या केबीएचके विद्यालय खालपच्या इतिहासात केंद्रात प्रथम क्रमांक मुलीने मिळविण्याचा मान जयश्रीला मिळाला असून तिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल केबीएचके विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बी एम सुर्यवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चह्णण सर, वर्गशिक्षक श्री निकम सर आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभिनंदन केले आहे .
शिवाय शालेय व्यवस्थापन कमेटी खालप, सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत खालप आणि सर्व ग्रामस्थ यांनी जयश्रीचे कौतुक केले असुन जयश्रीने विद्यालयाचे आणि गावाचे नाव लौकिक केल्याबद्दल लवकरच तिचा गौरव केला जाणार आहे .
सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी सरांनी ९५% गुणांसह केंदात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५००१/- रु रोख बक्षिस देण्याचे आश्वासन दिले होते .
परंतू ९१.७६% गुणांसह जयश्रीने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने श्री सुर्यवंशी सर तिला १००१/- रू रोख बक्षिस स्वरूपात देणार आहेत.