Home Breaking News *नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून पुढील आदेशापर्यंत (लाॕकडावुन)ताळेबंदी -*

*नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून पुढील आदेशापर्यंत (लाॕकडावुन)ताळेबंदी -*

157
0

*नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून पुढील आदेशापर्यंत (लाॕकडावुन)ताळेबंदी –
नांदेड, दि. १ ; राजेश एन भांगे*

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेवून पुढील आदेश पावेतो दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा (लॉकडाऊन) कालावधी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाढविला आहे.
यापुर्वीच्या आदेशान्वये नियमावलीसह दिनांक 31 जुलै, 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटीं व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सकाळी 7-00 ते सायंकाळी 5-00 वाजपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. दिनांक 19 जुलै, 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेश पावेतो वाढविण्यात येत आहे.

Previous article*🛑 जे. जे.मध्ये सुरूय भोंगळ कारभार 🛑*
Next articleमालेगांव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती उत्सवात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here