• Home
  • कोरोनासंदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु –

कोरोनासंदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु –

कोरोनासंदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

जालना, दि. ३१ – कोरोना संदर्भातील नागरिकांच्या असलेल्या अडचणी, समस्या या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली असुन त्याचा क्रमांक 7262927373असा आहे. कोरोना संदर्भात आवश्यक असलेल्या आरोग्य विषयक माहितीसाठी या हेल्पलाईनवरुन तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत तर नागरिकांच्या काही प्रशासकीय अडचणी असतील त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सोडविण्यात येणार आहेत.
कोरोनासंदर्भात आरोग्य तसेच प्रशासकीय समस्या, अडचणी असतील तर नागरिकांनी हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment