*28 जुले जागतिक निसर्ग रक्षण दिन* *नाशिक ,( विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-* मित्रानो पर्यावरण समतोल मानवी जीवनसाठी किती महत्वाचे आहे याचा अनुभव आपण आजच्या या कोरोना संकटात घेत आहोत थोडा विचार करा कित्येक वर्ष झाली जुन महिना पावसा आभावी कोरडा जात होता या वर्षी जुन सुरुवातीला ढ़ग दिसू लागले व काल बरसले देखिल असे का याचा जर आपण खोल विचार केला तर आपल्या लक्षात येईल की गेले 3 महिने कोरोना मुळे सगळे जग थांबले आहे, कारखाने बंद होती, वाहने रोड वर नाही त्यांमुळे प्रदुषण रोखले गेले त्यामूळे प्रदूषण मुक्त हवा ढ़ग निर्मीती साठी पोषक ठरली आहे, आपण हे जग कायम थांबू शकत नाही पण पर्यावरण, निसर्ग जोपासू शकतो हे आपल्या हातात आहे, निसर्ग रक्षण करने हे आपले कर्तव्य समजून आपण भरपूर झाडे लावली पाहिजेत, जंगल तोड थांबवली पहिजे, नुकत्याच आलेल्या निसर्ग वादलाने अनेक जुनी झाडे कोसळून पड्ली आहे त्या जागी नविन झाड लावा, लक्षात ठेवा आता निसर्ग कोपला आहे त्याचा अनुभव आपण घेत आहोत, म्हणूण पर्यावरण समतोल ठेवणे हे आपले सामुहिक जबाबदारी समजून निसर्गाचे पालन पोषण करु या, पाऊस सुरु झालाय जामिन थंड झाली आहे चला तर मग प्रतेकाने एक झाड तरी लावू या, मागिल वर्षी पावसाळ्यात आम्ही आमच्या सोसाइटी समोर मोकळ्या जागेत झाडे लावली होती ती पाऊस सुरु झाला म्हणूण आनदित दिसली व 1 वर्षात येव्हढ़ी मोठी झाली उन्हालयात आपण त्याना वाचवू शकलो याचे समाधान वाटले व सहजच नविन उर्जा आमच्यात आली आणी आज जागतिक निसर्ग रक्षण दिन आम्ही नविन झाडे लावुन साजरा केला, आज जागतिक निसर्ग रक्षण दिन म्हणून सोशल मिडिया वर अनेक सन्देश बघायला मिळतील पन कृती मात्र शुन्य असेल, झाडे लावताना फोटो कुठे दिसणार नाहित, निसर्गावर खोटे प्रेम दाखवू नका, कृती करा आणी ही काळाची गरज आहे, निसर्ग वाचला तर आपन जगू हे सत्य कुणी नाकारु शकत नाही,आम्ही आपले कर्तव्य पार पाडले आता आपण पुढ़े येऊन झाड लावुन निसर्गाचे ऋण फ़ेडा, झाडे लावा झाडे जगवा,