• Home
  • ऑल इंडिया पँथर सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सिद्धार्थ काळे यांची निवड

ऑल इंडिया पँथर सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सिद्धार्थ काळे यांची निवड

ऑल इंडिया पँथर सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सिद्धार्थ काळे यांची निवड
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे, मुंबई अध्यक्ष संदेश वाघचौरे, संतोष गायकवाड, अरुण साबळे यांनी ही नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. तरुणांची सर्वात मोठी संघटना म्हणजे ऑल इंडिया पँथर सेना होय. दलित अत्याचाराविरोधात लढणारं हे संघटन आहे, संविधान, आरक्षण, शिष्यवृति, सामाजिक न्याय, मूलभूत प्रश्न, अस्मितेचे प्रश्न घेऊन आक्रमकपणे बंडखोर वृत्तीने लढा दिला जातोय.
स्वाभिमान, लढाऊवृत्ति, आक्रमक बाणा, विद्रोहाचा विस्फोट करणारा बंडखोर म्हणून संघटना प्रचलित आहे.
मुंबईमध्ये ऑल इंडिया पँथर सेनेचं मोठं संघटन वाढलं आहे येणाऱ्या काळात मुंबईत मोठा जन एल्गार पुकारण्याच्या तयारीने संघटन काम करीत आहे
सिद्धार्थ काळे उच्चशिक्षित पत्रकार व संघटनात्मक बांधणी करणारा अनुभवी चेहरा आहे. मुंबईत मोठं संघटन तो बांधून आणि मनुवादी व्यवस्थेविरोधात डरकाळी फोडेतील…
त्यांच्या अभिनंदनासह पुढील वाटचालीस शुभेच्छा!

anews Banner

Leave A Comment