*नव्या दमाच्या चेहऱ्यांना युवक काँग्रेसमध्ये संधी*
*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात प्रामुख्याने सामान्य घरातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे .सोबतच कार्यकारिणीच्य कामाचा आढावा घेत काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नतीदेखील देण्यात आली आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सचिव आणि विधी विभागाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. ( आमदार ऋतुराज पाटील यांची युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास व प्रभारी हरपाल सिंह यांच्या मान्यतेने ही युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर केली. काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा असल्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य चेहऱ्यांना युवक कार्यकारणीत संधी दिली असल्याचे सांगत हे पदाधिकारी त्यांच्या कार्याने पक्षाला बळकटी देतील असा विश्वास यावेळी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.