Home Breaking News *जिल्ह्यात 2 हजार 557 जणांनी केली करोनावर मात* *आज 247 नवे...

*जिल्ह्यात 2 हजार 557 जणांनी केली करोनावर मात* *आज 247 नवे कोरोना रुग्ण* रोहा,.रायगड दि.2 जुलै *(ब्युरो टिम युवा मराठा न्युज

189
0

*जिल्ह्यात 2 हजार 557 जणांनी केली करोनावर मात*

*आज 247 नवे कोरोना रुग्ण*

रोहा,.रायगड दि.2 जुलै *(ब्युरो टिम युवा मराठा न्युज )*:- आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील *2 हजार 557* रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर *आज 247 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद* होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-856, पनवेल ग्रामीण-405, उरण-59, खालापूर-85, कर्जत-70, पेण-73, अलिबाग-60, मुरुड-9, माणगाव-40, तळा-3, *रोहा-73,* सुधागड-3, श्रीवर्धन-14, महाड-9, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 762 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 457 , पनवेल ग्रामीण-368, उरण-227, खालापूर-19, कर्जत-75, पेण-68, अलिबाग-88, मुरुड-17, माणगाव-67, तळा-12, *रोहा-54,* सुधागड-2, श्रीवर्धन-10, म्हसळा-29, महाड-36, पोलादपूर-28 अशी एकूण 2 हजार 557 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-65, पनवेल ग्रामीण-12, उरण-8, पेण-5, अलिबाग-5, *रोहा-14* असे एकूण *109* नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-79, पनवेल ग्रामीण-17, उरण-5, खालापूर-5, कर्जत-6, पेण-2, अलिबाग-6, मुरुड-2, माणगाव-2, तळा-2, श्रीवर्धन-3, म्हसळा-3, महाड-7 पोलादपूर-1 असे *एकूण 140 नागरिक मृत पावले आहेत*. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-115, पनवेल (ग्रा)-67, उरण-4, खालापूर-14, कर्जत-6, पेण-13,अलिबाग-12, *रोहा-16,* अशा प्रकारे एकूण 247 ने वाढ झाली आहे.
*आजच्या दिवसात 6 व्यक्तींची* (पनवेल मनपा-2, पनवेल ग्रामीण-1,उरण-1, खालापूर-1,पेण-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून *10 हजार 21* नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी *5 हजार 422* नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या *140* आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या *4 हजार 459* आहे.

Previous articleदि.२/७/२०२० भिला आहेर मेशी:- सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी धोबीघाट येथे
Next articleनांदेड” कोरोनातून आज रोजी ६ रूग्ण झाले बरे झाले तर नवीन ७ व्यक्ती कोविड १९ ने बाधित झाले – नांदेड, दि. २ : राजेश एन भांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here