• Home
  • || *आषाढी वारीचे महत्व* || 🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* 🚩🚩🚩

|| *आषाढी वारीचे महत्व* || 🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* 🚩🚩🚩

|| *आषाढी वारीचे महत्व* ||

🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* 🚩🚩🚩

मनुष्याचे एक वर्ष हे देवांची अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो.
आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची, विश्रांतीची) एकादशी,’ असे म्हणतात.
देवांच्या या निद्रकालात, (विश्रांतीच्या काळात) असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरी शक्तींपासून स्वतःचे सौंरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
असाच एक मृदुमान्य नावाचा राक्षस होता या राक्षसाने भगवान शंकराची मनोभावे तपस्या करून घेऊन श्री भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यामुळे त्यांनी त्या मृदुमान्य राक्षला श्री भगवान शंकरांनी वर दिला की; तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तुला मरण येईल, असा वर दिल्यामुळे आनंदित होऊन त्या उन्मत झालेल्या राक्षसाने देवांवर स्वारी केली. त्यावेळी सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे गेले मात्र श्री भगवान शंकरांनी त्या मृदुमान्य राक्षसाला वर दिल्यामुळे भगवान शंकरांना काहीच करता येत नव्हते. त्यावेळी देव श्री भगवान शंकरांसह एका गुहेत जाऊन बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची या संकटातून मुक्तता केली. त्यादिवशी मुसळधार पाऊस पडू लागला आणि देवांना अन्न मिळाले नाही, व उपवासी राहावं लागलं व सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला.
त्या दिवापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात घडला. या देवीचे नाव एकादशी आहे.
*उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे*
शास्त्रानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो व त्यादिवशी घरात प्रसन्नता ठेवतो व सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सोवळ्यात पूजा करून ग्रंथ वाचन, किंवा अभंग, हरिपाठ म्हणतो व रात्री फराळाचे पदार्थ किंवा वरव्याचे तांदुळाच्या भात व सोबत शेंगदाण्याची सफेद आमटी हे खाऊन व दुसऱ्या दिवशी बारस सोडतो, याप्रमाणे जी व्यक्ती उपासना करते ती व्यक्ती पाप मुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत

anews Banner

Leave A Comment