• Home
  • कोरोनाने नवरदेवाच्या भावाचा मृत्यू, हळदीला हजर राहिलेल्या पाहुण्याचं काय झालं

कोरोनाने नवरदेवाच्या भावाचा मृत्यू, हळदीला हजर राहिलेल्या पाहुण्याचं काय झालं

कोरोनाने नवरदेवाच्या भावाचा मृत्यू, हळदीला हजर राहिलेल्या पाहुण्याचं काय झालं ?    पनवेल (रायगड) l नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, प्रशासन खडबडून जागं झाल्याची घटना पनवेल महापालिका क्षेत्रात घडली आहे.पनवेलजवळच्या नेरे गावात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

25 जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करु नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसंच लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येते, रितसर परवानगी घेऊन लग्नसोहळे करावेत असं प्रशासनाने बजावलं.

anews Banner

Leave A Comment