Home Breaking News आॕनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ७४ शेतकऱ्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली...

आॕनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ७४ शेतकऱ्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली सुनावणी – नांदेड, दि. २७ ; राजेश एन भांगे

102
0

आॕनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ७४ शेतकऱ्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली सुनावणी – नांदेड, दि. २७ ; राजेश एन भांगे

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत पोर्टलवर प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समिती कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून तक्रार निवारणाची प्रक्रिया 26 जून पासून सुरु झाली. जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठका झाल्या असून जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत 74 शेतकऱ्यांच्या पोर्टलद्वारे प्राप्त तक्रारी, आक्षेपावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुनावणी घेतली. या ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधे मुळे नांदेड येथे जाण्या-येण्याचा प्रवास करावा लागत नसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने”महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019″ ही दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच अल्पमुदत पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील30 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाख रुपयापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी स्थगित होती. त्यानंतर 18 जून पासून आधार प्रमाणिकरण सुरु करुन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.

नांदेड जिल्ह्यात एकूण 1 लाख 85 हजार 983 शेतकऱ्यांची कर्ज खाती यायोजनेंतर्गत प्राप्त झाले असून आधार प्रमाणिकरणासाठी 1 लाख 63 हजार 894 शेतकऱ्यांची संकेतस्थळावर यादी प्राप्त झाली आहे. त्यापैकी 1 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर 51 हजार 27 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण करतेवेळी शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती रक्कम किंवा आधार क्रमांक याबाबत आक्षेप घेतल्यामुळे पोर्टलद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे आजपर्यत प्राप्त तक्रारीची संख्या 716 आहे. या 716 तक्रारीपैकी वर नमूद केल्याप्रमाणे 74 आक्षेपकर्त्याच्या तक्रारीची सुनावणी घेण्यात आलेली आक्षेपाबाबत कार्यवाही चालू आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here