• Home
  • इंटरनेट कनेक्टेड स्मार्ट फेस मास्क, कॉल आणि ट्रान्सलेशन करू शकता मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

इंटरनेट कनेक्टेड स्मार्ट फेस मास्क, कॉल आणि ट्रान्सलेशन करू शकता मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 इंटरनेट कनेक्टेड स्मार्ट फेस मास्क, कॉल आणि ट्रान्सलेशन करू शकता 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 जून : ⭕ संपूर्ण जग करोना व्हायरस संकटाचा सामना करीत आहे. आता लोकांनी हळू हळू नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. करोनावर अद्याप औषध बनवण्यात आले नाही. त्यामुळे या आजाराला दूर ठेवण्याचा सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. करोना महामारी संकटात जपानच्या एका स्टार्टअपने नवीन इनोव्हेटिव फेस मास्क बनवले आहे. या मास्कला कनेक्टेड सुद्धा म्हटले जाऊ शकते.

हे मास्क इंटरनेट कनेक्टेड सोबत येतो. हे स्मार्ट फेस मास्क मेसेज ट्रान्सलेट करतो. जपानी भाषेतून ८ भाषेत ट्रान्सलेट (भाषांतर) करण्याचे आणि कॉल करण्याचे काम हे फेस मास्क करू शकते. या स्टार्ट अपचे नाव Donut Robotics आहे. कंपनीने नवीन मास्कला ‘c-mask’ नाव दिले आहे. हे प्लास्टिकचे बनवले आहे. तसेच यात एक ब्लूटूथ – डिव्हाईस आहे. जे स्मार्टफोन आणि टॅबलेट पैकी एकाला कनेक्ट करू शकते. त्यानंतर स्पीचला टेक्स्टमध्ये भाषांतर करू शकतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे मास्क घातलेली व्यक्ती आवाज सुद्धा वाढवू शकते. सी मास्क ला युजर आपला नियमित मास्कच्या वर घालू शकतात.

रिपोर्टच्या माहितीनुसार, Donut Robotics च्या इंजिनियर्सला करोना संकटाचा सामना करीत असताना ही आयडिया सूचली. सी मास्क ची किंमत ४० डॉलर आहे. कंपनी सप्टेंबरपासून बाजारात ५ हजार मास्क आणण्याच्या तयारीत आहे. तसेच स्टार्टअप चीन, यूरोप आणि अमेरिकेत सुद्धा हे मास्क विक्री करणार आहे. डोनट रोबोटिक्सचे चीफ एक्झिक्युटिवने रॉयटर्सला दिलेल्या माहितीत सांगितले की, आम्ही एक रोबोटला तयार करण्यासाठी खूप वर्ष मेहनत केली आहे. आम्ही त्या टेक्नोलॉजीचा वापर अशा प्रोटक्टसाठी केला आहे. ज्याला करोना व्हायरसने समाजाला बदलण्याचे काम केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment