Home Breaking News CoronaEffect: तब्बल ६ हजार कर्मचाऱ्यांची ‘या’ एअरलाईनमधून होणार कपात 🛑 मुंबई (...

CoronaEffect: तब्बल ६ हजार कर्मचाऱ्यांची ‘या’ एअरलाईनमधून होणार कपात 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

389
0

🛑 CoronaEffect: तब्बल ६ हजार कर्मचाऱ्यांची ‘या’ एअरलाईनमधून होणार कपात 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 26 जून : ⭕ कोरोना व्हायरस महामारीचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या २ ते ३ महिन्यात झालेल्या नुकसानीमुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास (Qantas) एअरलाइन्स कंपनीने साधारण ६ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील विमान कंपन्यांचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या विमान कंपनीलाही कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे.

वर्षभर १०० विमाने उड्डाण घेणार नाही इतकेच नव्हे तर क्वांटास एअरलाइन्सनी आपल्या १५ हजार कर्मचार्‍यांची रजा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय क्वांटास कंपनीने आपली १०० विमाने एक वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळासाठी उड्डाण घेणार नसल्याचे सांगितले आहे. कंपनी आपल्या ६ शिल्लक बोईंग ७४७ विमानांना देखील त्वरित हटवणार आहे.

या निर्णयामुळे अनेकांवर परिणाम होणार या संदर्भात, एअरलाइन्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह एलन जॉयसी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत उत्पन्न कमी असल्याने एअरलाइन्स आता खूपच लहान बनली आहे. ते म्हणाले की, मागील काही वर्षात कमी उत्पन्नामुळे एअरलाईनला मोठे नुकसान झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे त्यांच्या करिअरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. आम्ही जे पाऊल उचलत आहोत, त्यामुळे आमच्या हजारो लोकांवर परिणाम नश्चित होईल, असे देखील त्यांनी सांगितले.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here