• Home
  • पुणे नगरसेवकांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे नगरसेवकांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे नगरसेवकांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ मागील 4 महिन्यांत कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले आहे. या कालावधीत सर्वोपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटप, जेवण वाटपासून ते आरोग्य साहित्य पुरविण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. जनतेत मिसळताना, सार्वजनिक ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणत खबरदारी घेतली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना कोरोना होत असल्याचे समोर येत आहे.

वडगावशेरी मतदारसंघातील एका नगरसेविकेला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याचा भागात एका नगरसेवकाच्या घरातील सदस्याला कोरोना झाला होता. शिवाजीनगर मतदारसंघात एका नगरसेविकेच्या घरात सदस्याला कोरोना झाला होता.
पुणे महापालिका महिला पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसच्या नगरसेवकालाही कोरोना झाला आहे. सुमारे 8 ते 10 नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला आहे.

त्यामुळे आता इतर नगरसेवकांनी आणखी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘मला काहीही होणार नाही’, असे वागून चालणार नाही. नगरसेवकांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने त्यांच्या भोवती गर्दी करीत असतात.

कोरोना आता कोणालाच सोडायला तयार नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजर लावणे, वारंवार हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पुणे महापालिकेच्या सुमारे 108 अधिकारी-कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे.
महापालिका आवारात मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने कोरोनाची भीती वाढली आहे. सध्या रोज 2500 पेक्षा जास्त चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे आणखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे…⭕

anews Banner

Leave A Comment