🛑 दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील आरती राजेंद्र पवार यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. एनटीबी या कॅटेगिरीमधून त्या राज्यात पहिल्या आल्या आहेत.🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
केडगाव(पुणे) :⭕दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील आरती राजेंद्र पवार यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. एनटीबी या कॅटेगिरीमधून त्या राज्यात पहिल्या आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला. त्यात आरती पवार यांनी पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. आयोगामार्फत त्यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी त्यांची पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी, कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. सध्या त्या बारामती नगरपालिकेमध्ये कर निरीक्षकपदावर कार्यरत आहेत. झारगडवाडी येथील जिल्हा परिषदेचे आदर्श प्राथमिक शिक्षक राजेंद्र पवार यांच्या त्या मुलगी आहे.
आरती यांचे प्राथमिक शिक्षण देऊळगावगाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे, तर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देऊळगावगाडा येथे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या यशाबद्दल आरती पवार म्हणाल्या, मी गेली तीन वर्षे साधा मोबाईल फक्त कॅालिंगसाठी वापरला आहे. सोशल मीडियापासून मी सुरवातीपासून दूर राहिले आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी असा कोणताही न्यूनगंड बाळगू नये. माझ्या आईवडिलांनी मला खूप सहकार्य केले. मला कोणतेही काम सांगितले नाही. किंवा माझ्यापुढे कोणत्याही समस्या आणल्या नाहीत. मला प्राध्यापक व्हायचे होते, मात्र बरोबर आजपासून तीन वर्षापूर्वी 19 जून 2017 रोजी मी शिवाजीराव मोरे यांच्या राज अॅकेडमीने आयएएस झालेल्या सूरज जाधव यांचे व्याख्यान ठेवले होते. ते ऐकले आणि प्राध्यापकाची नोकरी सोडली. आणि फक्त स्पर्धा परीक्षेवर फोकस केला. गेल्या अडीच वर्षात मी चार स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या. आई व वडीलांनी मला पूर्ण फ्री हॅंड दिला होता. शिक्षक व आईवडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावणे गरजेचे वाटत नाही. कारण, क्लासेस हे फक्त तुम्हाला दिशा दाखवतात. मेहनत प्रत्येकाला आपआपली करावी लागते. आज मिळालेले यश अपेक्षेपेक्षा मोठे आहे…⭕