• Home
  • MPSC परीक्षेचा निकाल जाहीर! साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर! साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 MPSC परीक्षेचा निकाल जाहीर! साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕ MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुलै राज्यात पहिला आला आहे. उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील रविंद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आहे आहे. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील पहिली आली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ रोजी १७ फेब्रुवारी २०१९ ला मुंबईसह अन्य ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती.
या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. प्रस्तुत मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

मुख्य परीक्षेसाठी ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. आता त्यातल्या ४२० जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाचा अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर १० दिवसांच्या आत ऑनलाइन फॉर्म भरावा असंही आवाहन आयोगाने केलं आहे. लॉकडाउन आणि करोना यामुळे निकाल कधी लागेल याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. मात्र MPSC चा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment