🛑 एमपीएससीच्या स्थगित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 18 जून : ⭕ कोरोना विषाणू संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आल्या होत्या . मात्र आता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
थोड्या दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. आता मात्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासादायक बातमी मिळाली आहे.
या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकातून सांगण्यात आलं आहे.⭕