• Home
  • मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले

मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले

🛑 मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 16 जून : ⭕ महाराष्ट्रामध्ये करोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांचे प्रमाण ३९५० इतके असून, दगावलेल्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतच आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे दिसून आले आहे. मुंबईमध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत २१८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मुंबईतील रुग्णसंख्याही सर्वाधिक असून, ती ५८,२२६ इतकी आहे.

महाराष्ट्रात मृत्यू दर ३.६६ टक्के आहे. रुग्णांची संख्या १,०७,९५८ नोंदवण्यात आली आहे. भारतातील रुग्णसंख्या ३,३२,४२४ आहे. तर देशाचा मृत्यू दर २.८६ टक्के आहे. शून्य ते दहा वर्षे वयोगटामधील ३५३५ मुलांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहेत. ११ ते २० वयोगटातील ६७११ मुलांना करोना झाला आहे. यापूर्वी या वयोगटातील मुलांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण अधिक नव्हते. ते आता वाढलेले दिसते. २१ ते ३० वयोगटामधील रुग्णांची संख्या १९,७२१ आहे. तर ३१ ते ४० या वयोगटात ही संख्या २०,८३४ आहे. ५१ ते ६० वयोगटातील १७,९०६ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. ११ ते २० वयोगटातील लागण झालेल्या लहान मुलांमधील प्रमाण ६.४३ टक्के आहे. तर २१ ते ३० वयोगटामध्ये हे प्रमाण १८.९० टक्के नोंदवण्यात आले आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या २८१ रुग्‍णांपैकी २०० रुग्‍ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ११४ पुरुष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६० टक्के रुग्णांवर वैद्यकीय उपचार दिले जात असून, या रुग्णांची प्रकृतीही सुधारत आहे. यातील ४ रुग्ण हे १५ ते २० वर्षे वयोगटातील असून, ५१ रुग्‍ण २१ ते ३० वर्षे वयोगटातील, ३५ रुग्‍ण ३१ ते ४० वर्षे तर, २३ रुग्‍ण ४१ ते ५०, ३० रुग्‍ण ५१ ते ६० तर २९ रुग्‍ण ६१ ते ७० वर्षे वयोगटातील आहेत. २० रुग्ण हे ७१ ते ८०, २० रुग्‍ण ७१ ते ८० आणि ८ रुग्‍ण ८१ वर्षे व त्‍यावरील वयोगटातील आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment