Home गुन्हेगारी कंगनाने केले आरोप हेच लोक ‘ सुशांतच्या निधनाला कारणीभूत

कंगनाने केले आरोप हेच लोक ‘ सुशांतच्या निधनाला कारणीभूत

179

🛑 कंगनाने केले आरोप
हेच लोक ‘ सुशांतच्या निधनाला कारणीभूत ! 🛑
✍️ मुंबई (विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. नैराश्यात सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या बोललं जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगाना रणौतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे.
पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण
देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल.
कंगणा पुढे सांगते, छिछोरे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावर चुकीचे आर्टिकल लिहिले होते. यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाहीत पण त्यांनी सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अनेक लोक मला मेसेज करतात की, तुझा कठीण काळ आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की, या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्यांना बरोबर आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं.

कंगना नेहमीच बॉलिवूडमधल्या नेपोटिझमबद्दल बोलत आली आहे. अनेकदा यावरून वादही झाले आहे. छिछोरे नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमची शिकार झाल्याचं बोललं जात आहे…⭕

Previous articleशाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.
Next articleमहाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी ! मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.