Home Breaking News
142
0

🛑 स्टार ‘राणुमंडल’वर लाँकडाऊन मध्ये ! अन्न मिळणंही झालं अवघड 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणू मंडल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट आली. देशभर त्यांचं कौतुक केलं जाऊ लागलं. सिनेमासह अनेक टीव्ही चॅनल्सवर गाण्याच्या माध्यमातून राणू मंडल यांचा आवाज सगळीकडे पोहोचला. सोशल मीडियाच्या तर त्या नायिका झाल्या. मात्र काही महिने लोटल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा पालटली असून राणू मंडल यांच्या नशीबात पुन्हा जुने दिवस आले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचं जेवण मिळणंही राणू मंडल यांच्यासाठी कठीण झालं आहे. त्यांना कधी एक वेळचं जेवण, त्यातही फक्त भात मिळत असल्याचं समोर आलं आहे. आसपासच्या लोकांनी काही दिलं तरच त्यांना अन्न मिळत आहे.
अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या राणू यांच्या एका व्हिडिओमुळे आयुष्य़ बदललं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याच राणू मंडल यांच्यावर ही वेळ ओढावल्याच्या आताची स्थिती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडल यांना संधी दिली आणि राणू मंडल यांनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं सुप्रसिद्ध गाणं ‘प्यार का नगमा’ हे गाणं राणू मंडल यांनी गायलेल्या गाण्याने तर लोक स्तिमित झाले. मात्र ही लोकप्रियता आणि यश हे राणू यांच्यासाठी क्षणिकच ठरलं.🛑

Previous articleलॉकडाऊन : तीन महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता आणि व्याज घेता, कसे काय? – सर्वोच्च न्यायालय
Next articleशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते लोकांना मदत करत आहेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here