नाशिकः कळवण तालुक्यात रात्रीच्या सुमारास भीषण असा अपघात होऊन तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी आहे.
अभोणा हद्दीत कनाशी ते वरखेडा दरम्यान खडकवण फाट्या जवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक होऊन हा अपघात घडलाय.
यामध्ये प्रकाश सीताराम बागुल 35, रा,कोसुर्डे व नामदेव पवार, 30, सरले दिगर,आनंदा वाघमारे 25,बेंदीपाड असे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर हिराबाई ठाकरे 40,वैशाली बागुल 40 कोसुर्डे यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरु आहे.नाशिक ग्रामीणचे अभोणा पोलीस तपास करीत आहे.