🛑 २४ तासात एकही पोलिस कोरोना पॉझिटीव्ह नाही 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
महाराष्ट्र ⭕राज्यात पोलिस दलासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासात पोलिस दलात एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आत्तापर्यंत २ हजार ५६२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तपासणी नाक्यावर तसेच बदोबस्तासाठी पोलिसांना काम करावे लागते. त्यामुळे त्यांचा संपर्क कोरोनाग्रस्तांच्याबरोबर होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा होत होती.⭕