• Home
  • बीड जिल्ह्यात आज 2 खुनाच्या घटना, जिल्ह्यात क्राइममध्ये कमालीची वाढ

बीड जिल्ह्यात आज 2 खुनाच्या घटना, जिल्ह्यात क्राइममध्ये कमालीची वाढ

बीड जिल्ह्यात आज 2 खुनाच्या घटना, जिल्ह्यात क्राइममध्ये कमालीची वाढ
बीडः(प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
-आंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन या गावातील ज्ञानोबा सोपान मुसळे वय 38 या व्यकतीचा अज्ञात मारेकऱ्यांनी बाहेरच्या परिसरात खुन करून ,
खापरटोन येथील शासकीय पाण्याच्या टाकी जवळ मध्यरात्रीच्या नंतर प्रेत आणून टाकले आसावे आसा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे
खुन कोणी केला,का केला ,यामागचे गौडबंगाल काय आहे याची माहिती आणखी प्राप्त झाली नसून बर्दापुर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत
तर दुसरी घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीड येथुन मुलीच्या घरी मांडवखेल येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेचा खून करून प्रेत पुरल्याच्या घटनेला स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये तोंड फुटले आणि महिला हरवल्याची तक्रार असलेल्या या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून सदरील महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी बीडचे तहसीलदार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कबाडे, उपाधीक्षक सावंत, एपीआय केंद्रे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
बीड येथील अंकुश नगर भागातील अलका हनुमंत जोगदंड वय 40, असे या महिलेचे नाव असून दोन तारखेला तिच्या पतीने नेकनुर पोलिसात हरवल्याची फिर्याद दिली होती . सदर महिला तिचा जावई राहत असलेल्या मांडवेखेल येते आली होती
तिचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी जावई आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
या घटनांसह जिल्ह्यात खुनाच्या गुन्हात वाढ झाली आसूण आठ दिवसात 6 जनांचे खून झाल्याने पोलीस प्रशासणासमोर हा नवीन पेच निर्माण झाला आहे

anews Banner

Leave A Comment