• Home
  • नायगाव व कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने फेस शील्ड तर रा.यू. काँ.चे वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने सॅनीटायझर व मास्क चे वाटप

नायगाव व कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने फेस शील्ड तर रा.यू. काँ.चे वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने सॅनीटायझर व मास्क चे वाटप

*नायगाव व कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने फेस शील्ड तर रा.यू. काँ.चे वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने सॅनीटायझर व मास्क चे वाटप*.
*नांदेड, दि. ३ ; राजेश एन भांगे*
नायगाव : कोरोना प्रादुर्भाव आज संपुर्ण देशासह मागील तीन महिन्यांपासून शहरी व ग्रामीण भागात वाढत आहे.यादरम्यान या कोरोनायुध्दात पोलिस कर्मचारी काम करत आहेत.त्याच अनुषंगाने पोलिस कर्मचारी यांचे संरक्षण व्हावे म्हणून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने फेसशील्ड मास्क वाटप करण्यात आले. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च न करता, कोरोना पासून आपल्या सर्वांची रक्षा करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना सॅनीटायझर,मास्क चे वाटप केले.
तसेच नायगाव पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक पडवळ साहेब, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटेकर साहेब व तसेच इतर २० पोलिस कर्मचऱ्यांना वरील साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे कुंटूर येथे कुंटुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पठाण साहेब, पोलीच उप निरीक्षक येवले साहेब यांच्यासह इतर २० पोलिस कर्माऱ्यांना वरील साहित्याचं वाटप करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम, शेषेराव पा.लाब्दे, संभाजी तुरटवाड, मा.उपसरपंच शिवाजी पा.ढगे, ग्रा. पं.सदस्य बालाजी हाळदेवाड, ग्रा. पं. सदस्य श्याम यमलवाड, ज्ञानेश्वर पा.ढगे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

anews Banner

Leave A Comment