Home Breaking News परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी खोकला

परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी खोकला

131
0

🛑 परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी खोकला🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

यवतमाळ :⭕कोरोनाच्या नियंत्रणासाठी २ मेपासून गावस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार परजिल्हा आणि परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची नोंद केली आहे.
रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवसात जिल्ह्यात ५७ हजार ४८६ नागरिक परतले आहे. या नागरिकांना सर्दी, खोकला किंवा इतर आजार आहे का याची पाहणी ही समिती करीत आहे.
समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन हजार २८० नागरिकांना सर्दी आणि खोकला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. हा संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २० हजार ३४५ नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बाहेर जायचे असेल तर परवानगी लागेल
परजिल्हा, परराज्य या ठिकाणावरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन कालवधीत कुठेही बाहेर जात येत नाही. तीव्र लक्षणे दिसल्यास तालुका समितीकडे या रुग्णांना वर्ग करण्याच्या सूचना आहे. याशिवाय क्वारंटाईन प्रक्रियेतील बाहेर पडलेल्या व्यक्तीला बाहेर जायचे असेल तर तशी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

Previous articleराज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता
Next articleआजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here