• Home
  • जेष्ठांनो काळजी करू नका कोरोना रोखण्यासाठी देणार “हे” औषध

जेष्ठांनो काळजी करू नका कोरोना रोखण्यासाठी देणार “हे” औषध

🛑 जेष्ठांनो काळजी करू नका
कोरोना रोखण्यासाठी देणार “हे”
औषध 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील वयाची साठी ओलांडलेल्या सुमारे ६ लाख ज्येष्ठांना व्हिटामिन सी, डी आणि मिनरलच्या झिंक सल्फेट गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. यानुसार या सर्वांना सलग सहा आठवडे या गोळ्या दिल्या जाणार आहेत. यापैकी व्हिटामिन डीची आठवड्यातून एकदा एक गोळी तर, व्हिटामिन सी आणि मिनरलच्या झिंक सल्फेट या गोळ्यांचा दररोज सकाळ, संध्याकाळ याप्रमाणे सलग सहा आठवडे डोस देण्यात येणार आहे.

येत्या आठवड्यापासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या गोळ्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून (जिल्हा परिषद स्वनिधी) ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर अगदी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या आसपासच होती. परंतु आंतरजिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या मूळ गावाकडे येण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सुमारे २०० रुग्ण हे फक्त मुंबई, पुणे रिटर्न असल्याचे आढळून आले आहे…

anews Banner

Leave A Comment