• Home
  • पोलीस मित्राचा ड्रेस घालून व्हिडिओ करणं मुलीला पडलं महागात!

पोलीस मित्राचा ड्रेस घालून व्हिडिओ करणं मुलीला पडलं महागात!

🛑पोलीस मित्राचा ड्रेस घालून व्हिडिओ करणं मुलीला पडलं महागात!🛑
ठाणे 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मिरा रोड :-मसध्या टिकटॉक तरूणांमध्ये प्रचंड फेमस आहे. तरूण आपला बरासचा वेळ या टिकटॉकवर घालवतात. एखादी घटना घडली किंवा नवी चित्रपट, गाणं आलं की लगेचच त्यावर टिकटॉकचा व्हिडिओ तयार होतोच.  टिकटॉकवर फेमस होण्यासाठी टिकटॉक स्टार्स मजेदार व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे त्यांचे फॉलोवर्स वाढतात.  पण हाच टिकटॉक व्हिडिओ करणं एका मुलाली चांगलच महागात पडलं आहे. या मुलीने आपल्या पोलिस मित्राचा ड्रेस घालून टिकटॉक व्हिडिओ केला होता. त्यामुळे या मुलीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिरा रोड पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सरकारी पोशाख त्याच्या मैत्रिणीने परिधान करून टिक टॉकवर व्हिडीओ केला.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.देशात कोरोना व्हायरसपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस २४ तास ऑनड्यूटी असतात. मात्र काही अशा घटनामुळे पोलिस प्रशासनाचे नाव खराब होत आहे.

मिरा रोड पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सरकारी पोशाख त्यांच्या मैत्रिणीने घालून गाणे गात टिक टॉकवर व्हिडीओ टाकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिस अधीक्षकांनी त्याची गंभीर दाखल घेत त्याच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anews Banner

Leave A Comment