Home पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*

ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*

206

*ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*
*कोल्हापूर(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात किणी गांव मुंबई बेंगलोर हायवेलगत असलेल्या गावामध्ये बरेच दिवसापासून ग्रामीण रूग्णालयाची मागणी होती.
सदर रूग्णालयाचा फायदा जवळपासच्या गावातील नागरिकांना होणार आहे.
तालुक्याचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर यांच्याकडे प्रलंबित ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मा.मंत्री महोदयांनी लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गील लावण्याचे आश्वासन दिले.
तसेच या ग्रामीण रूग्णालयाचा आसपासच्या खेड्यातील गोरगरिबांना लाभ घेता येईल, आणि हायवेवरती सतत अपघात होत असतात. अपघातील जखमींवर लवकरात लवकर उपचार करता येईल असे उदगार मंत्रीमहोदय यांनी व्यक्त केले.

Previous articleदीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात !
Next articleझोडगेच्या कोरोना तपासणी केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली पाहणी भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.