Home माझं गाव माझं गा-हाणं देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला...

देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.

227

देवळा तालुक्यात मेशीत एका महिलेचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
देवळा:-देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मूळ टेम्भे ता. बागलाण येथील रहिवाशी असलेली ( मुंबईस्थित)व वासोळपाडे(फुलेनगर) ता देवळा येथील माहेर असलेली महिलेचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने व त्या महिलेचा १८ तारखेला नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.त्यामुळे आजपर्यंत सुस्थितीत असलेल्या देवळा तालुक्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव होतो की काय आणि तालुक्यात आतापर्यंत प्रशासनाने आणि नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरते की काय अशी शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता तालुका प्रशासन योग्य त्या उपाययोजनांसाठी सज्य झाले असून आज गुरुवार दि.२१ ते रविवार दि.२४ सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सरपंच सुनंदा अहिरे,उपसरपंच भिका बोरसे,आणि ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे

Previous articleनांदेड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन चार रुग्ण ६४ जणांच्या स्वॅबची तपासणी चालू
Next articleकोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.