- ⭕ बँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार ⭕
-
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत, जिल्हा प्रशासनाने गेल्या सहा दिवसापासून शहरातील सर्व बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता गुरूवार(ता.२१) बँका सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी एक यावेळत बँका सुरू राहतील, अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी बुधवारी(ता.२०) दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्व तर आजचे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक लॉक डाऊन मोडत आहे. यामुळे १५ ते १७ आणि १८ ते २० मे दरम्यान रात्री बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. शहरातील सर्व बँका बुधवारपर्यंत बंद होत्या.
सर्व ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा या सुरू राहणार आहेत. या सुविधा सुरळीत राहावी यासाठी सर्व बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यरत होते.असेही श्रीकांत कारेगावकर यांनी सांगितले.कँटोन्मेंट झोनमधील बँकांच्या शाखा बंद
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानुसार कोरोना प्रभाव असलेल्या भागातील बँकाच्या शाखा ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या १५ हुन अधिक शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद असलेल्या शाखांमधील कर्मचारी हे इतर शाखांमध्ये पाठवण्यात आले आहे.