
वाशिम : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
‘साहेब, आमच्याकडे कीट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाही, कामाचा प्रचंड तणाव आहे. तुम्ही, मुख्यमंत्री असता तर आमच्यावर आज ही वेळ आली नसती.’ अशी व्यथा जऊळका पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या किन्हीराजा येथील महामार्गावर पेट्रोलिंग करणार्या पोलिस कर्मचार्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.१७) दुपारी दीडच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला जात होते. यावेळी खंडेराव मुंढे यांच्या आग्रहामुळे ते पाच मिनिटांसाठी किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूल येथे थांबले व मालेगाव तालुक्यातील शेतकर्यांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी आपण सर्वांनी कोरोनापासून स्वतःची काळजी घ्यावी, असे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी सुरेश मुंढे व विनोद घुगे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्यांची देवेंद्र फडणवीस यांनी आपुलकीने विचारपूस केली. यावेळी संबंधित पोलिस कर्मचार्याने आपली व्यथा मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तुम्ही ड्युटी करत असताना कोरोनासारख्या संसर्ग रोगापासून आपला बचाव करा. स्वतःची काळजी घ्या. कारण, तुम्ही अहोरात्र सेवा देत आहात’ असे सांगितले.