Home Breaking News लाँकडाऊन ४.० महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद जाणुन घ्या !

लाँकडाऊन ४.० महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद जाणुन घ्या !

136
0

 

लाँकडाऊन ४.० महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद जाणुन घ्या !
मुंबई : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिवांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे.

मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत.
जाणून राज्यात काय राहणार सुरू ?

दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं, साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. कार्यालयीन ठिकाणी हात धुण्याची सुविधा आणि हँड सॅनिटायझर आवश्यक आहे.
औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स, डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था

काय राहणार बंद?
खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.
तसंच खासगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे, पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि दोन व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त जअत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर

Previous articleपोलीस अधीक्षकाच्या स्टींग ऑपरेशनमुळे चेकपोस्टवरील दोषी आढळलेले 3 पोलीस निलंबित
Next articleमुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here