Home Breaking News विदर्भातील रूग्णालयात 31 हजार 970 वैयक्तिक सुरक्षा संच(पीपीई किट)

विदर्भातील रूग्णालयात 31 हजार 970 वैयक्तिक सुरक्षा संच(पीपीई किट)

224

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह

विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक सुरक्षा संच, एन-९५ मास्क आणि त्रिस्तरीय मास्क उपलब्ध आहेत. विदर्भातील सर्व रुग्णालयांमध्ये ३१ हजार ९७० वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई किट) उपलब्ध आहेत, अशी माहिती मेयोच्या अधिष्ठात्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.

पार्वतीनगर येथील एका तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे अनेक डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून रुग्णांवर उपचार करणाऱ्यांनाच सुविधा पुरवण्यात येत असल्याचा दावा सुभाष झंवर यांनी केला होता. त्यावर नोडल अधिकारी रुद्रेश चक्रवर्ती यांनी सांगितले की, पार्वतीनगरचा तरुण हा बारुग्ण विभागात दाखल झाला होता. मृत्यूनंतर तो करोनाबाधित असल्याचे उघड झाले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या संपर्कात आलेले पाच डॉक्टर, सहा परिचारिका व कर्मचारी विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. विदर्भातील मेडिकल, मेयो, एम्स, अकोला, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा संच, एन-९५ मास्क व त्रिस्तरीय मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये ३१ हजार ९७० संच असल्याची माहिती मेयोच्या अधिष्ठात्यांच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली.

Previous articleपडेल प्रस्थापितांनी विधान परिषदेचा नाद सोडावा, नव्या चेहऱ्यांचाच विचार व्हावा!
Next articleआषाढीवारी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्रीअजित पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.