Home Breaking News एक देश एक रेशनकार्ड’ची योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

एक देश एक रेशनकार्ड’ची योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

138
0

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या आर्थिक पॅकेजची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद झाली. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी पत्रकार परिषद होती. अर्थमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेत शेतकरी, स्थलांतरीत मजूर, छोटे व्यापारी यांच्यावर केंद्रीत योजनांची माहिती देण्यात आली.एक देश एक रेशनकार्ड’ची घोषणा

एक देश एक रेशनकार्ड योजनेची घोषणा करण्यात आली आहे. योजना संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. देशातील कोणत्याही रेशन दुकानातून स्थलांतरीत मजूर ५ किलो धान्य घेऊ शकतात. ५-५ किलो गहू आणि तांदूळ मिळतील सोबतच एक किलो डाळ मिळेल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही सर्व प्रवासी मजदुरांसाठी आणणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही राज्यातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करु शकता. ८ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद सरकार करणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ५-५ किलो तंदूळ आणि गळू आणि प्रत्येक परिवाराला १ किलो डाळ देण्यात येईल.

*
छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांना मदत

देशातील छोटे व्यापारी आणि शेतकरी, स्वयंरोजगार करणारे नागरिक यांना दिलासा देण्यात आला आहे. तीन कोटी शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जाचा फायदा मिळाला. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गरीबांच्या खात्यात सर्वात आधी मदत पोहोचवण्यात आली. २५ लाख नव्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले. तीन कोटी शेतकऱ्यांना चार लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

1 कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी २४ टक्यांच्या हिस्सा पुढील तीन महिने सरकार भरेल. 2 खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि कामगार यांना भरावा लागणारा १२ टक्के हिस्सा आता १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
3 आंतर-राज्यीय स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी व्याख्या करायला हवी, जेणेकरुन त्यांच्यापर्यंत लाभ अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवता येतील.
4 सर्व मजुरांना नियुक्तपत्र मिळणार
5 मुद्रा योजनेतून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना २ टक्क्यांची मदत
6 कमी भाड्यामध्ये मजूर आणि शहरी गरिबांना घर मिळणार
7 प्रवासी मजुरांसाठी भाडे तत्वावर घराची योजना
8 रेशन कार्डचा वापर संपूर्ण देशभरात कुठेही करता येणार, ‘एक देश एक रेशनकार्ड’ सरकारची नवी योजना
9 रेशन कार्ड नसलेल्यांना ५ किलो धान्य देणार
10 प्रवासी मजुरांना दोन महिन्यांचं धान्य देणार
11 मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणार
12 मजुरांच्या मजुरीतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न
13 आतापर्यंत दोन कोटी ३३ लाख मजुरांना काम दिलं
स्थलांतरीत मजुरांची सरकारला काळजी आहे
14 शहरातील बेघर नागरिकांना तीन वेळचं जेवण
15 स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात परत जात आहेत त्यांनाही काम देणार
16 स्थलांतरित मजूर आणि इतरांच्या देखभालीसाठी राज्यांना ११,००० कोटी रुपये देण्यात आले आहेत
17 बचत गटांनी १ लाख २० हजार लिटर सॅनिटायझर बनवलं
१२ हजार बचत गटांकडून ३ कोटी मास्कची निर्मिती
18 गेल्या दोन महिन्यांत ७२०० बचत गटांची स्थापना
19 सहकारी-ग्रामीण बँकांसाठी २९ हजार ५०० कोटी रुपये
शहरी भागातील गरिबांना ११ हजार कोटी रुपयांची मदत
20 पिकांच्या खरेदीसाठी ६७०० कोटी रुपये
21 त्वरित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजावर मिळणारी सवलत आता ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
22 शेतीसाठी ८६ हजार ६०० कोटींचं कर्ज दिलं आहे
23 महिन्याभरात २५ लाख किसान क्रेडिट कार्डचं वाटप
आज जाहीर करण्यात येणारे निर्णय हे शेतकरी, छोटे व्यापारी, स्थलांतरीत मजूर यांना दिलासा देतील
गरीब कल्याण योजनेतून मजुरांना मदत
वर्षभरात ३ कोटी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून कर्जाचा लाभ मिळाला
मजुरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा
स्थलांतरित मजुरांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार
मजूर, शेतकरी, फेरीवाले यांच्यासाठी खास आर्थिक पॅकेज
आजच्या उपक्रमांमध्ये एकूण ९ उपाययोजना आहेत. स्थलांतरित मजुरांशी संबंधित ३, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी १, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे, छोटे शेतकरी २, गृहनिर्माण १ इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे.

Next articleअखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड,अधिकृत घोषणा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here